धनादेश अनादरण : आरोपीस १ महिने सश्रम कारावास

Foto
८० हजार रुपये नुकसाभरपाई देण्याचे आदेश

वैजापूर, (प्रतिनिधी) : येथील साईआराध्य निधी लिमिटेड सवंदगाव कडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आल्या प्रकरणी आरोपीस १ महिने सश्रम कारावास तसेच रूपये ८० हजार रुपये नुकसान भरपाई फिर्यादी वैजापूर येथील साई आराध्य निधी लिमिटेड सवंदगाव यांना द्यावी व रक्कम नाही भरल्यास अतिरिक्त ६ दिवस साध्या कारावासाची शिक्षा असे आदेश सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अति. मुख्य न्यायदंडाधिकारी  डी. एस. पिसाळ यांनी दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर येथील साईआराध्य निधी लिमिटेड सवंदगाव यांचे कडून आरोपी कृष्णा नामदेव मत सागर (वय: २८ वर्ष रा. मुक्कामः जरूळ पोस्टः रोटेगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांनी सदर साई आराध्य निधी लिमिटेड सवंदगाव कडून कर्ज घेतले होते. असे की, कर्जाऊ घेतलेल्या रकमेची ठरल्याप्रमाणे परतफेड न केल्यामुळे फिर्यादिने आरोपीकडे सदर रकमेची मागणी केली तेंव्हा आरोपीने फिर्यादी साईआराध्य निधी लिमिटेड सवंदगावचां नावाने दि. ११ जून २०२५ रोजीचा रक्कम रूपये ६५,९२९, चा बँक लिमिटेड शाखा वैजापूर चा धनादेश दिला.

 हा धनादेश फर्यादिने त्याचे खाता असलेली महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वैजापूर ता. वैजापूर येथे वटविण्यासाठी टाकला. परंतु चेक काढणाऱ्याची सही वेगळी ह्या कारणाने आरोपीने दिलेला धनादेश न वटता अनादरित होऊन दिनाक २५ जून २०२५ रोजी परत आला. 

धनादेश न वटता अनादरित होऊन परत आल्यानंतर फिर्यादिने आरोपीस मजहर बेग यांचा मार्फत दिनाक २७ जून २०२५ रोजी नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम जमा करण्यास सांगितले होते. परंतु. आरोपीस दिनाक १ जुलै २०२५ रोजी नोटीस मिळून देखील आरोपीने धनदेशाची रक्कम मुदतीत जमा केली नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपी विरुद्ध दिनाक २९ जुलै २०२५ रोजी वैजापूर येथील न्यायालयात धाव घेऊन अॅड. मजहर करीम बेग यांचेमार्फत चलनक्षम दस्तावेज कायदा १८८१ चे कलम १३८ नुसार ईफायलिंग द्वारे फिर्याद दाखल केली होती.

 न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील परिपूर्ण फिर्याद, साक्षी पुरावा व फिर्यादी वैजापूर येथील साईआराध्य निधी लिमिटेड सवंदगाव चे वकील मजहर करीम बेग केलेल्या प्रभावी युक्तिवादाचा आधारावर न्यायालयाने आरोपीस आज दिनाक २ सप्टेंबर २०२६ रोजी वरीलप्रमाणे दणका देत निकाल दिला. सदर प्रकरणात फिर्यादी साईआराध्य निधी लिमिटेड सवंदगाव तर्फे अॅड. मजहर करीम बेग यांनी काम पाहिले.